Why C Language?

डॉटनेट, जावा, सी-शार्प, पी.एच.पी. अशा प्रकारच्या लॅंग्वेज व फ्रेमवर्क चा जमाना असतांना C किंवा C++ सारख्या लॅंग्वेजीस शिकणे जरूरी आहे काय व असल्याच तर किती सखोल ज्ञान घेणे जरूरी असते अशा प्रकारचे प्रश्न कायम विचारले जातात. आम्हाला वाटतं खालील गोष्टींचा विचार करून तुम्हीच निर्णय घ्यावा.

  • सी लॅंग्वेज ही आत्ताच्या सर्व लॅंग्वेजचा व कंप्युटर सायंन्स चा पाया आहे

IT आणी Computer Science ची सर्व तत्वे, उदा. प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजीस, कंप्युटर आर्कीटेक्चर, ऑपरेटींग सिस्टीम, नेटवर्क कम्युनीकेशन्स, ग्राफीकल युझर इंटरफेस, इमेज प्रोसेसींग, मल्टीथ्रेडींग, रियल टाइम सिस्टीम, आणी गेम्स या सर्वांमध्ये सी लॅंग्वेजचा डायरेक्ट अथवा इंडायरेक्ट संबध असतो. त्यामुळे सी च्या नॉलेजचा हे सर्व कळण्यासाठी उपयोग होतो…

  • सी लॅंग्वेज ही आत्ता सुद्धा सर्वात जास्त वापरली जाणारी लॅंग्वेज आहे

डेस्कटॉप, मोबाइल मधील ऑपरेटींग सिस्टीम्स, ई-मेल क्लायंट्स, वेब ब्राउझर्स हे सी आणी सी++ मध्ये लिहीले गेले आहेत. जवळपास सर्व गेम्स व त्याचे कंट्रोलर्स हे सी मध्येच डॆव्हलप केले जातात. प्रोग्रॅमिंग पॉप्युलॅरीटी इंडेक्स २०१० च्या सर्वेक्षणानुसार सी/सी++ (27%) या प्रथम दोन नंबरच्या लॅंग्वेजीस असून जावा (18%) तिसऱ्या नंबर वर आहे.   

  • सी लॅंग्वेज ही आत्ता सुद्धा embedded devices साठी प्रथम पसंती आहे

हार्डवेअर इंटरऍक्शन करण्यासाठी तसेच डिव्हाइस ड्रायव्हर लिहीण्यासाठी सी लॅंग्वेजला प्रथम पसंती दिली जाते. Automobile, industrial machinery, medical equipments, household appliances to traffic light signals, vending machines, cell phones, याचे सर्व कंट्रोल करणारे मायक्रोप्रोसेसर्स embedded C मध्ये लिहीले जातात.

  • सी लॅंग्वेज ही आत्ता सुद्धा जगातील सर्व महाविद्यालये विद्यापीठात शिकवली जाते

सी चे उत्तम ज्ञान महाविद्यालयातील पुढील सर्व शाखेचे विविध सब्जेक्ट्स समजण्यासाठी होतो. कोणत्याही शाखेचे संशोधन करतांना सी लॅंग्वेजचे कंसेप्ट्स logic development साठी उपयोगी येतात.

  • सी लॅंग्वेज ही सगळ्या कंप्युटर लॅंग्वेजीसची मुळ भाषा आहे

सी चे अनेक कंसेप्ट्स व सिंटॅक्स सी++, जावा, पायथॉन, पर्ल, रुबी, पी.एच.पी या लॅंग्वेज मध्ये वापरलेले आहेत. त्यामुळे सी लॅंग्वेज चांगल्या प्रकारे समजली तर पुढील भाषा शिकतांना अडचणी येत नाहीत. सी मधील एक्स्प्रेशन्स, लुप्स, कंट्रोल स्ट्रक्चर्स, इनपुट-आउट्पुट स्टेटमेंट्स, फंक्शन्स हे सर्व या आत्ता वापरल्या जाणाऱ्या लॅंग्वेजचा एक तर भाग आहे किंवा लायब्ररीमधून कॉल केली जातात.

  • सी लॅंग्वेज ही सगळ्या कंप्युटर लॅंग्वेजीसची उत्तम मॉडेल आहे

सी लॅंग्वेजची प्रिंसीपल्स जर कळाली तर object oriented programming, event driven programming, multi-thread programming, real time programming, embedded programming, network programming, parallel programming, grid computing and cloud computing ची मॉडेल्स सहज पणे कळतात…

  • सी लॅंग्वेज ही लॉजीक बिल्डींग साठी उत्तम समजली जाते

जगातील अनेक कंपन्यामध्ये कोणत्याही प्रकारचे कंप्युटर प्रोफेशनल्सची गरज असेल तर interview हा सी पासून चालू होतो व सी++ वर संपतो. इतर कोणत्याही लॅंग्वेजचे ज्ञान फ्रेशरला नसले तरी त्या लॅंग्वेज त्याला शिकता येतील असा एक मापदंड पडला आहे.

 

Leave a Reply