Chap. 1 : Unit 5 : Structure of C Language : Part 5

C language मध्ये program लिहीताना user कडुन input घेणे, प्रक्रिया करणे, output monitor वर print करणे ही कामे करावी लागतात. output print करताना C मध्ये उपलब्ध असलेले library functions वापरणे जरुरी असते. library मध्ये printf() enlightened हे फंक्शन आहे. त्याचा वापर केल्यास आपल्याला screen वर print करता येते.

समजा तुम्हाला welcome to C programming हे screen वर print करायचे असल्यास तुम्ही printf(“welcome to C programming”); असे program मध्ये लिहावे लागेल. ते print करण्यासाठी चे function असल्या मुळे त्याला printf function असे संबोधतात.

memory मध्ये असलेली value जरी तुम्हाला print करायची असली तरी तुम्ही याच function चा वापर करु शकता. समजा x आणि y अशी दोन variables तुम्ही dclare केली आहेत. त्यामध्ये दोन integer store करुन त्याची बेरीज करुन तुम्हाला ती sum या integer variable मध्ये store करायची आहे. ते तुम्ही sum = x + y असे expression लिहुन करु शकता.

पण ते print करायचे असेल तर तुम्हाला ते statement printf(“sum = %d”,sum); असे लिहावे लागेल. printf(“welcome to C programming”); व printf(“sum = %d”,sum); या statements चा आपण सविस्तर अर्थ आता पाहु कारण आपण अशी अनेक प्रकारची library functions सर्व C च्या topic मध्ये वापरणार आहोत. 

या मध्ये printf() हे function आहे कारण round brackets आहेत. त्याच्या आत एक , आहे याचा अर्थ दोन parameters आहेत. पहीले हे शक्यतॊ “ मध्ये असते त्याला string असे म्हणतात. ही string जशी आहे तशी screen वर print केली जाते. वर असलेल्या पहिल्या printf function मध्ये string मध्ये welcome to C programming असे लिहीले आहे. म्हणुन ते तसेच print होते.

दुसऱ्या printf function मध्ये string मध्ये sum = %d असे लिहीले आहे. त्या मधील sum =  हे आहे तसे print केले जाते. त्या नंतर %d लिहीले आहे. याला format specifier enlightenedअसे म्हणतात. आपल्याला x या variable मधील value integer स्वरुपात print करायची आहे. ते संगणकाला व compiler ला कळण्यासाठी format specifier लिहावा लागतॊ. %d हा integer साठी format specifier आहे. तो string मध्ये ज्या ठिकाणी तुम्ही लिहाल त्या ठिकाणी तो पहील्या ,च्या नंतर variable असेल त्यामधील value print करण्याचे काम करतॊ. वर दुसऱ्या printf statement मध्ये , नंतर sum मध्ये sum मधील x + y ची बेरीज जी store करुन ठेवली आहे ती print करेल. 

समजा x मध्ये 5 व y मध्ये 10 store केला असेल तर १५ ही sum या variable मध्ये store केली जाईल. समजा आपल्याला output 5 + 10 = 15 असे हवे असेल तर printf स्टेटमेंट printf(“%d + %d = %d”,x,y,sum); असे लिहावे लागेल. या मध्ये पहील्या %d च्या वेळी तॊ x मधील, दुसऱ्या %d च्या वेळी y मधील व तिसऱ्या %d मध्ये sum मधील value print करेल.

त्यामुळे format specifier चा sequence व variable चा sequence हा सुसंगत असण्याची काळजी programmer ने घेतली पाहीजे.smiley 

Access this framework with lot more stuff like C language MCQ, viva and interview preparation, Glossary, Solved Programs of C language etc.

cenglishcppengcmarathi

Leave a Reply