Introduction to Language Part 4

Chap. 1 : Unit 3 : Introduction to Language: Part 4

मुलांनो आज तुम्ही जो निर्णय घेतला आहे ना  C Language शिकायचा तॊ असाच योग्य निर्णय आहे. कारण C language ची महतीच मुळी सर्व जगात English भाषे सारखी वादातित आहे. त्याची माहीती घेण्यास सुरुवात करण्या पुर्वी आपण थोडे Computer Programming Languages ची थोडक्यात वर्गवारी बघुन घेऊ. 

 

संगणक भाषांची वर्गवारी

संगणकीय भाषा प्रामुख्याने तीन प्रकारांमध्ये मोडतात.
High Level Language
Middle Level Language
Low Level Language
हाय लेव्हल लॅंग्वेज
समजायला अतिशय सोप्या व सुलभ अशा बेसीक (BASIC – Begineer’s All purpose Symbolic Instruction Code), कोबोल (COBOL – COmmon Business Oriented Language), पास्कल व फोर्ट्रान (FORmula TRANslation) High Level Language ओळखल्या जातात. जसे Marathi Maharashtra तच चालु शकते, Kanada Karnataka मध्ये चालु शकते तसे वरील सर्व नमुद केलेल्या languages application dependent आहेत म्हणजेच ठराविक application develop करावयाचे असेल तर ठराविक भाषा शिकायला लागते. उदा. एखादे Business Application लिहायचे असेल तर COBOL शिकायला लागते तर Scientific application साठी Fortran लागायची. शिवाय या language चा system software develop करायला उपयोग होत नसायचाच. 

Low Level Language : 
या ला Machine Level Language असेही ओळखले जाते. ही म्हणजे संगणकाला जी 0 व 1 ची भाषा कळते ती. अर्थात संगणकाला ती कळत असली तरी 0 व 1 चे combination वापरुन संगणकाला command देणे फार जिकरीचे काम आहे. पण तुम्हा मुलांना हे ऐकुन आश्चर्य वाटेल की पुर्वी तुमच्या सारख्या प्रोग्रॅमरनीच या भाषेमध्ये प्रोग्रॅम लिहुन काम करुन घेतले आहे. त्या मानाने तुम्ही नशिबवान! 

मिडल लेव्हल लॅंग्वेज :
नावा प्रमाणेच High Level Language व Low Level Language चे drawbacks काढुन फक्त strengths मिळावेत अशा develop केलेल्या सर्व  सॉफ्टवेअरचे तयार करण्याची क्षमता नसुन System Software सुद्धा करता येते. इतकेच नव्हे तर hardware बरोबर communication करायचा असेल तर सुद्धा याचा उपयोग होतो.
आपण High Level Language अथवा Middle Level Language वापरताना तो program संगणकीय भाषा म्हणजेच Low Level Language मध्ये translate करण्याकरीता language translator ची गरज असते. जसे तुम्ही उद्या Andhra प्रदेशामध्ये गेलात तर तुम्हाला एक तर Telgu भाषा यायला पाहीजे अथवा एक दुभाशी बरोबर हवा जो तुमचे मराठी वाक्य तेलगु मध्ये convert करेल. तसेच C stateement हे machine code मध्ये रुपांतरीत करण्यासाठी language translator गरज compiler पुर्ण करतॊ. compiler सुद्धा एक software असते. आपण program लिहीला की run करण्यापुर्वी compile करायला लागतो. आपण TC जे वापरणार आहोत तो compiler च असुन Turbo C या Borland International कंपनीचा ते संक्षिप्त रुप आहे. Microsoft प्रमाणेच Borland International ही प्रसिद्ध कंपनी compiler लिहीण्यात वाकबगार आहे. बाजारात इतर सुद्धा अनेक compiler उपलब्ध आहेत जसे Microsoft चा VC++ चा compiler! प्रत्येक लॅंग्वेजला स्वत:चा एक compiler लागतॊ. जसे BASIC language चा स्वत:चा compiler असतॊ. त्याच प्रमाणे C++ व Java लॅंग्वेजला त्याचे Compiler आहेत. 

इंटरप्रिटर :
सुद्धा एक Language Translator एक प्रकार आहे. compiler program मधील सर्व statements एका वेळी translate करतॊ व मग सगळी एकावेळी execute करतॊ. त्या उलट interpreter एक statement एका वेळी translate करतॊ व लगेच execute करतॊ. मग पुढील statement translate करतॊ. C language ही compiled language ओळखली जाते तर सध्या ज्या language चे वारे जगभर वाहते ती Java Language साठी compiler व interpreter दोनहीचा वापर केला जातो. त्यामुळे जावाला compiled व interpreted language म्हणतात. 

Access this framework with lot more stuff like C language MCQ, viva and interview preparation, Glossary, Solved Programs of C language etc. please register (log in) free on Register / Login

cenglishcppengcmarathi

Leave a Reply