Introduction to Language Part 3

Chap. 1 : Unit 3 : Introduction to Language: Part 3

महत्वाचे तुम्हा मुलांना सांगायचे आहे म्हणजे language चे concepts शिकवले जाणार आहे. जसे शाळेमध्ये तुम्हाला poem अथवा novel लिहायला शिकवत नाहीत तर भाषेचे grammar शिकवले जाते. तसेच program हे तुम्हाला स्वत:चे logic वापरुन दुसऱ्याचा program copy न करता लिहायचे आहेत. व technique शिकला तर तुमच्या पैकी प्रत्येक जण ते लिहु शकणार..जसे अनेक वेळा असे होते की मुले C language शिकतात, program लिहुन रन करुन output सुद्धा बरोबर दाखवतात. पण program मधील statement चा अर्थच त्यांना माहीत नसतॊ. 

Mastering C

त्या मुळे आपण cricket शिकतो म्हणजे rules व technique शिकतॊ, कुठे कसे खेळावे ते  कधीच शिकत नाही कारण ते फारसे बदलत नाही. C language शिकतांना आपण त्याचे grammar म्हणजेच syntax व concepts शिकणार आहोत. त्यामुळे या सर्व अभ्यासक्रमा मध्ये आपण C चे programs हे C language चे syntax चे techniques व concepts शिकुन झाल्यानंतर प्रत्येक पाठाच्या शेवटी करणार आहोत. व हो महत्वाचे म्हणजे ते तुम्ही करायचे आहेत. शेवटी आपल्याला Sachin Tendulkar व्हायचे आहेना? जास्त मॅचेस खेळुन तेंडल्या होता येत नाही. Ramakant Acharekar सरांनी technique शिकवले व अजुनही आपला Sachin Tendulkar technique शिकतॊ म्हणुनच त्याला Technical Player म्हणतात!!!! 

Language Translator

वर नमुद केलेल्या System Software मध्ये कंपायलर चा उल्लेख केलेला आहे. संगणक शास्त्रा मध्ये या प्रकारच्या सॉफ्टवेअर ला language Translator म्हणतात. interpreter, assembler हे सुद्धा अशाच प्रकारचे language Translator आहेत. एका व्यक्तीने बोललेले जर दुसऱ्या व्यक्तीला कळाले नाही तर दुसरा काय बोलेल ते पहील्याला कळणार नाही. आणी मग सगळाच गोंधळ होऊन जाइल. language Translator म्हणजे काय आपण सविस्तर पद्धतीने पुढे पहाणार आहोत. 

Need of Computer Language

Software म्हणजेच program लिहीण्यासाठी एखाद्या language ची गरज लागते. जसे एखादी कथा, poem लिहीण्यासाठी भाषाची जरुरी असते किंवा आपण दुसऱ्या व्यक्तिशी संभाषण करण्यासाठी अथवा दुसऱ्याला command देण्यासाठी एखाद्या भाषेची गरज असते तसेच संगणकाशी संभाषण करण्यासाठी अथवा त्याकडुन काम करुन घेण्यासाठी संगणकीय भाषेची जरुरी असते. 

Computer Languages

तुम्हाला हे ऐकुन आश्चर्य वाटेल कि computer world मध्ये शेकडो भाषा आहेत. तुमचा विश्वास बसत नसेल तर Google Search Engine मध्ये computer language असे टाईप करा व Wikipedia या site ला बघा. तुम्हाला शेकडो भाषा बघायला मिळतील!!!! या मध्ये २५० भाषेहुन अधिक आजही वापरल्या जातात. 

National languages

आपण त्यामधील आज C ही Language शिकण्यास जमलेलो आहोत. आपल्या मनात असे येउ शकते की आपल्या या अतिशय लहान शैक्षणिक कारकिर्दीमध्ये कीती computer languages तुम्ही शिकु शकता? पण मुलांनॊ आपण आपल्या दररोजच्या आयुष्यात तर कीती भाषेवर प्रभुत्व मिळवण्याचा अट्टाहास करतॊ. तुम्हाला माहीतच आहे की नुसत्या भारतातच Marathi, Hindi, Kanada, Telgu, Tamil, Bengali इत्यादी अनेक भाषा आहेत. 

Global languages

जगभरातील Chinese, French, German, Japanese वेगळ्याच!!!! पण Marathi व Hindi व्यतीरीक्त कोणती बरे भाषा आपण शिकण्याचा प्रयत्न करतॊ? मला वाटते तुम्हा सर्वांचे उत्तर English हेच असणार. काय कारण आहे त्याचे? जरा सखोल विचार केला तर देशातील कोणत्याही राज्यामध्येच नव्हे तर जगात जवळपास सर्वत्र English ही च Global भाषा म्हणुन ओळखली जाते.

Access this framework with lot more stuff like C language MCQ, viva and interview preparation, Glossary, Solved Programs of C language etc. please register for demo course.

cenglishcppengcmarathi

Leave a Reply