Introduction to C Language Part 2

Chap. 1 : Unit 4 : Introduction to C Language: Part 2

मराठी मध्ये अ..आ…इ…ई.. आणी इंग्रजी मध्ये A..B..C..D शिकवल जात. नंतर व्याकरण शिकवल जात  पण कथा-कादंबऱ्या-कवीता लिहावी अशी अपेक्षा १० वी – १२ वी पर्यंत नसतेindecision. मग C language शिकताना तेच शिकायच आहे…Syntax or Grammar of C Language…Project आलाच पाहीजे करता अशी अपेक्षा न ठेवता फक्त कंसेप्ट्स शिका…enlightened तुम्ही नंतर काहीसुद्धा करू शकता… हेच तर इथे सांगितलय…heart

आपणाला आठवत असेल तर english language शिकतांना आपण ठराविक पद्धतीने शिकलो आहोत. सर्व प्रथम आपण त्यामधील मुळाक्षरे म्हणजेच alphabets शिकलॊ. नंतर आपण छोटे छोटे words तयार करायला शिकलॊ. नंतर आपण sentence तयार करायला शिकलॊ व नंतर आपण अनेक वाक्यांची रचना करुन एखादा अर्थपूर्ण paragraph लिहण्याचा प्रयत्न केला. विद्यार्थ्यांनो आपण C language शिकतांना तोच मार्ग अवलंबायचा प्रयत्न करणार आहोत. 

C language चे structure
Alphabets, digits and special characters 

अगदी तसाच विचार केला तर पहिली पायरी म्हणजे त्या language मध्ये काय काय अक्षरे, चिन्हे व आकडे वापरले आहेत ती पाहु. Dennis Ritchie साहेबांनी आपल्या संगणकाच्या keyboard वरील जवळपास सर्व बटणांचा language मध्ये समावेश केला आहे. म्हणजे बघा A, B, C……X, Y, Z तसेच a, b, c….x, y, z ही सर्व वापरता येतात. शिवाय 0,1,2…9 हे सर्व digits वापरता येतात. या व्यतिरीक्त keyboard वर असणारी सर्व special characters सुद्धा फार हुशारीने वापरली गेली आहेत व त्यांना अर्थ दिले आहेत. 

उदा. semi colon symbol C language मधील statement चा शेवट करतांना वापरले आहे! 

Constants, variables and keywords

आपल्याला दुसरी पायरी शिकायची आहे ती म्हणजे C मध्ये कोणते constants वापरले आहेत. variables कशी declare करता येतात व keywords कोणते आहेत. प्रत्येक language मध्ये त्या language चे स्वत:चे हे सर्व ठरलेले असतात. आपण C language मधील हे कोणते आहेत ते पाहुया.

Access this framework with lot more stuff like C language MCQ, viva and interview preparation, Glossary, Solved Programs of C language etc. please register free on Register / Login

cenglishcppengcmarathi

Leave a Reply