File handling in C

Make Payment

“सी प्रोग्रॅमिंग झाले आहे पण स्ट्रक्चर आणी फाईल हॅंडलींग काही कळालेले नाही. पॉइंटर सुद्धा पुन्हा शिकवा”. आमच्या कडे येणाऱ्या विद्यार्थ्यांची हि एक कायमची तक्रार. अनेक जणांचा प्रवास मग स्ट्रक्चर पाशीच संपतो. फंक्शन आणी पॉइंटर अर्धवट कळते. मग स्ट्रक्चर कळत नाही. शेवटी फाईल हॅंडलींग समजण्याचा मार्ग निकालातच निघतो…

म्हणूनच आम्ही फाईल हॅंडलींग शिकवतांना सुद्धा सी लॅंग्वेज चे मागील महत्वाचे कंसेप्ट्स विचारात घेउन अतिशय सोप्या पद्धतीने हा कळीचा मुद्दा शिकवला आहे. या मध्ये आम्ही

 • फाईल म्हणजे नेमके काय
 • फाईल स्ट्रक्चर कसे असते
 • फाईल स्ट्रक्चरची गरज काय
 • फाईल पॉइंटर म्हणजे काय
 • फाईल कशी अक्सेस करता येते
 • लायब्ररी फंक्शन्स कशी व कोणती कामाला येतात
 • फाईल नेमकी कोठे असते
 • फाईल ओपन करणे म्हणजे काय करणे
 • फाईल हॅंडंलींग करतांना ऑपरेटींग सिस्टीम चा संबंध का येतो?
 • फाईल ओपनींग मोड्स कोणते
 • फाईल अक्सेस करतांना कोणती काळजी घ्यायची

इत्यादी अनेक कंसेप्ट्स फक्त थेरॉटिकल पद्धतीने समजावून सांगीतले नसून हे कंसेप्ट्स समाजावून सांगतांना प्रत्येक प्रोग्रॅमची प्रत्येक स्टेप समजावून सांगीतली आहे.

 1. या चॅप्टर च्या शेवटी फाईल हॅंडलींग मधील अनेक कंसेप्ट्स कळण्यासाठी मल्टीपल चॉइस क्वेशन्स ची टेस्ट दिली ती जाणीव पुर्वक अवघड केली असून टेस्ट चा मुळ उद्देश नॉलेज पडताळणी हा नसून नॉलेज मध्ये भर टाकणे हा आहे. टेस्ट व्यतीरीक्त विद्यार्थ्यांना या चॅप्टरनंतर असाइनमेंट्स दिल्या असून हे सर्व प्रोग्रॅम विद्यार्थ्यांनी स्वत: सोडवणे अपेक्षित आहे.
 2. या अभ्यासक्रमा मध्ये जवळपास ५ प्रोग्रॅम समजावून सांगीतले आहेत, २० प्रश्नांची टेस्ट आहेत व ५ प्रोग्रॅम्स विद्यार्थ्यांसाठी सोर्स कोड सहीत दिले आहेत.
 3. सी लॅंग्वेजमधील महत्वाचे कंसेप्ट्स ग्लॉसरी च्या स्वरूपात सुद्धा उपलब्ध करून ठेवले आहेत तसेच नोट्स सुद्धा मराठी मधून उपलब्ध करून ठेवल्या आहेत.

cenglishcppengcmarathi

Leave a Reply