FAQ

C Marathi™ हे नेमके काय आहे?

C Marathi™ हे Innovative Edutech Solutions Pvt. Ltd. या कोल्हापूर मधील संस्थेने तयार केलेले प्रॉडक्ट आहे. या प्रॉडक्ट मध्ये C Programming language चा सर्व अभ्यासक्रम अतिशय सुलभ व रंजक पद्धतीने e-learning च्या माध्यमातुन शिकवला आहे. तसेच इंग्रजी भाषेमधून सुद्धा हाच अभ्यासक्रम सुद्धा उपलब्ध आहे.

C Marathi™ ऑनलाइन अभ्यासक्रम आहे काय?

होय. E-learning माध्यमाद्वारे Udemy Online Portal वर तो ऑन-लाइन पद्धतीने उपलब्ध करून ठेवला आहे.

Udemy काय आहे?

Udemy हे जगातील सर्वात मोठ्ठे e-learning पोर्टल असून जवळपास ६०,००,००० विद्यार्थी ऑनलाइन पद्धतीने या पोर्टल वर शिकत असतात.

C Marathi™ ऑनलाइन अभ्यासक्रमाचा कालावधी किती आहे?

हा अभ्यासक्रम individual विद्यार्थ्यांने स्वत:च्या गतीनुसार व स्वत:च्या आकलन क्षमतेनुसार शिकण्यासाठी तयार केला आहे. त्यामूळे विद्यार्थी त्याचा कालावधी स्वत:च्या उपलब्ध वेळेनूसार व गतीप्रमाणे ठरवू शकतो. अर्थात विद्यार्थ्याला यातील कंसेप्टस भविष्यात कधीही पुन्हा पहायला लागण्याची शक्यता असते. म्हणून हा अभ्यासक्रम लाइफ-टाईम ठेवला आहे.

C Marathi™ ऑनलाइन अभ्यासक्रमामध्ये वेगळेपण काय आहे?

C Marathi™ या ऑनलाइन अभ्यासक्रमामध्ये सर्व C Programming language मराठीमधून शिकवली आहे. त्यामूळे विद्यार्थ्यास खालील फायदे होतील

 •           जरी तरी इंग्रजी भाषा कळण्यास अडचण येणार असली तरी C language शिकण्यास अडचण येणार नाही
 • ·         कोणताही विद्यार्थी त्याच्या आकलन क्षमतेनुसार व उपलब्ध वेळे नुसार शिकु शकतो
 • ·         संगणकाची प्राथमीक माहीती जरी असली तरी language त्याला चांगल्या पद्धतीने समजू शकते
 • ·         प्रत्येक चॅप्टर नंतर अनेक assignments व MCQ दिल्यामूळे तो स्वत:च त्याचे evaluation करेल
 • ·         विद्यार्थी/विद्यार्थीनी त्यांच्या घरामधून शिकू शकतील

C Marathi™ ऑनलाइन अभ्यासक्रमाचा उपयोग कोणत्या व्यक्तीला होइल?

कंप्यूटरचे ऑपरेटींग ज्ञान गृहीत धरुन हा अभ्यासक्रम तयार केला आहे. म्हणून हा अभ्यासक्रम खालील विद्यार्थ्यांना उपयोगी होइल.

 •       First year Engineering student
 •       First Year Diploma Student
 •       Directly admitted student to second year of engineering
 •       BCA student
 •       B.Sc. (Computers) student
 •       BCS student
 •       Second year student who is about to learn C++ language
 •       Final year student preparing for campus interview
 •       Pre-DAC student preparing for DAC entrance test
 •       S/W professionals
 •       Students staying in the remote area

C Marathi™ ऑनलाइन अभ्यासक्रमाला प्रवेश कसा मिळतो 

तुम्ही खालील पैकी कोणत्याही लिंक वर क्लिक करून पेमेंट करू शकता.

PayUMoney Learn C in Marathi

PayUMoney Learn C in English

Udemy Learn C in Marathi

Udemy Learn C in English

C Marathi™ ला रजिस्ट्रेशन अनिवार्य आहे काय?

नाही. परंतू पुढील अपडेट देण्यासाठी, ऑफर कळवण्यासाठी, तुम्ही रजिस्ट्रेशन केले असल्यास आम्हाला संपर्क साधता येइल. तुमची माहीती आम्ही कोणत्याही संस्थेशी अथवा व्यक्तीशी शेअर करत नाही व ती पुर्णपणे गोपनीय ठेवली जाते. आपले ई-मेल/फोन नंबर हे कोणत्याही कंपनीला अथवा व्यक्तीला दिले जात नाहीत.

C Marathi™ ऑनलाइन अभ्यासक्रमाचे चॅप्टर्स त्याच क्रमाने शिकणे बंधनकारक आहेत काय?

जर तुम्ही प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज प्रथमच शिकत असाल तर पहील्या चॅप्टर पासून शिकणे श्रेयस्कर आहे. कारण पुढील चॅप्टर्स शिकतांना तुम्ही नक्की अडचणीत येणार. सुरवातीच्या काही चॅप्टर्स मधील खुप कंटेंट्स तुम्हाला जरी माहीत आहेत असे प्रथमदर्शनी वाटले आणी पुर्ण चॅप्टर न अभ्यासता तुम्ही पुढे गेला तर अनेक कंसेप्ट्स समजण्यापासून तुम्ही वंचित राहू शकता.

शिकतांना काही कंसेप्ट्स कळाले नाहीत तर C Marathi™ कोणत्या प्रकारे मदत करू शकते?

C Marathi™ कडून e-mail च्या स्वरूपात मदत करण्याची सुविधा केलेली आहे. Udemy portal मध्ये मेसेज सुविधा उपलब्ध आहे.

C Marathi™ मध्ये प्रोग्रॅम लिहून टेस्ट करण्याची सुविधा आहे काय?

नाही. शिकण्यापुर्वी कोणताही C कंपायलर तुम्हाला Install करून घ्यावा लागेल.

कोणत्या कंपायलरवर प्रोग्रॅम लिहावेत?

सी मराठी मध्ये conventional DOS based TC compiler मध्ये प्रोग्रॅमचे explanation दिले आहे. तथापी तुम्ही कोणताही C चा compiler वापरून प्रोग्रॅमींग करू शकता.

C Marathi™ चे फ्रेमवर्क access करतांना कोणते हार्डवेअर हवे?

C Marathi™ चे फ्रेमवर्क असतांना तुमच्या कडे 1GB RAM असलेले Pantium मशीन हवे, ब्रॉडबॅंड इंटरनेट कनेक्शन हवे तसेच हेडसेट हवा. ऑपरेटींग सिस्टीम UNIX, Linux, Windows या पैकी कोणतीही चालेल.

आपल्या कडे स्मार्ट फोन / टॅब असल्यास तुम्ही Udemy App द्वारे कोर्स डाउनलोड करून ऑफलाइन पाहू शकता

सर्टिफीकेट मिळते काय?

 

आपण अभ्यासक्रम संपुर्णपणे म्हणजे सर्व व्हिडीओ/टेस्ट्स पुर्ण केल्यानंतर Udemy कडून आपल्याला Online सर्टिफीकेट पाठवले जाते.

Leave a Reply