Project Introduction

Demo Full video of “C Marathi” project

“Hello students…” अशी सुरवात करण्याऐवजी “नमस्कार विद्यार्थ्यांनो” अशी सुरवात करणं मला आवडेल

अर्थात कारणही तसचं आहे. आपण महाराष्ट्रातील

आपली मातृभाषा मराठी!

अगदी साहीत्यीक भाषेत सांगायचे म्हणजे मायबोली

ईंग्रजी मध्ये ५ स्वर म्हणजेच vowel व २१ व्यंजने म्हणजेच consonants  अशी एकुण २६ मुळाक्षरे

तर मराठीत १३ स्वर व ३१ व्यंजने अशी एकुण ४४ मुळाक्षरे अर्थात मराठी अवघडच

एकीकडे इंग्रजी ही साहेबांची भाषा

जगभर चालणारी, समजणारी

तर मराठी आपण जन्मल्यापासुन कानावर पडणारी

इंग्रजी शिकण्याची धडपड संपत नाही पण प्रभुत्व येण्यासही वेळ लागतो

मराठी आजुबाजुला सगळीकडेच आहे

आपण विचार मराठीतुन करतो

आपण उठल्या उठल्या मराठीच न्युजपेपर वाचतो

आपण उत्कृष्ट पणे मराठीतुनच भांडु शकतो

अहो इतकेच काय अर्वाच्य शब्द सुद्धा मराठीतुनच बोलले जातात व चांगले वजनदार सुद्धा असतात

आपल्या कल्पनेच्या भराऱ्या मराठीतुनच होतात

स्वप्न आपल्याला मराठीतुनच पडतात

आई, वडील, मित्र, मैत्रीणी, नातेवाइक इत्यादी सर्वांच्या बरोबर मराठीतुनच संवाद साधतो

हं नाही म्हणायला आपण इंटरव्ह्यु,  वायवा इंग्रजी मधुन देतो

पेपर इंग्रजी मधुन लिहीतो..इतकेच

मराठी सनदी अधिकाऱ्यांची संख्या कधी वाढली?

तर मुलाखती सुद्धा मराठीतुन देण्याचे धाडस कोल्हापुरच्या भुषण गगराणी यानी प्रथम केल्या नंतर….. हा इतिहास आहे!

आम्ही विचार केला, कंप्युटरची एक प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजच आपल्या बांधवाना मराठीतुन शिकवली तर….?

फ्रेंच अथवा जर्मन शिकायची असेल तर इंग्रजी चांगली लागते

म्हणजेच एक भाषा शिकतांना दुसऱ्या भाषेची अडचण ही असतेच हे सत्य नाकारता येणार नाही.

मग त्याप्रमाणे कंप्युटर मधील एक प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज शिकतांना इंग्रजी भाषेची अडचण तर सतावत नसेल ना?

शेवटी महत्वाचे काय?

विषय समजला की नाही….?

पुणे, मुंबई, नाशिक, औरंगाबाद इत्यादी शहरे वगळता सर्व ठिकाणी सी लॅंग्वेज शिकवणाऱ्या शिक्षकांची उणीव आहे… विद्यार्थी मात्र सर्वत्र पसरलेले आहेत

ज्या इंजिनीअरींग, डिप्लोमा, बी.सी.ए. कॉलेज मध्ये उत्कृष्ठ शिक्षकांची फौज आहे त्या ठिकाणी सी प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजचे कंसेप्ट्स पुन्हा पुन्हा शिकवणे, प्रत्येक विद्यार्थ्याच्या गतीने शिकवणे, प्रत्येक विद्यार्थ्यांच्या सामाजिक परीस्थिती विचारात घेउन म्हणजेच तो दुर्गम खेड्यातुन आला आहे का, तालुक्याच्या ठिकाणाहुन आला आहे का, शिक्षण मराठी भाषेतुन झाले आहे की सेमी-इंग्लीश मधुन याचा विचार करुन शिकवणे हे सर्व इच्छा असेल तरी अशक्य होते

याच सर्व मर्यादा ओळखुन आम्ही सी लॅंग्वेज मराठीतुन शिकवण्याचा घाट घातला

पहीले खरें आव्हान होते ते हे कि विद्यार्थ्यांना इ-लर्निंगच्या माध्यमातुन शिकवतांना त्यांच्या समोर शिक्षक आहे असे वातावरण तयार करण्याचा

शिवाय सी प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज शिकवतांना मराठी भाषा ही विद्यार्थ्याला जवळची वाटली पाहीजे

जसे शिक्षक शिकवतांना वापरतात तशी

दुसरे महत्वाचे आव्हान हे होते ते हे की विद्यार्थ्याला हे ऐकुन व बघुन शिकण्याची आवड निर्माण करण्याची

त्यामुळे विद्यार्थ्याच्या मानसिकतेचा (खर तर student psychology म्हणले तर जास्त योग्य होइल) अभ्यास करुन हे फ्रेमवर्क तयार करायचे होते

मन मग ते विद्यार्थ्याचे असो वा कुणाचे ही ते भरकटतच असते, त्याच्या भरकटणाऱ्या मनाचा प्रवास न बदलता त्याच वाटेवरुन कसे शिक्षण देता येइल त्याचा अभ्यास करुन हे करण्याचा प्रयत्न केला आहे

म्हणुन विद्यार्थ्याच्या कल्पना विश्वामधील उदाहरणे, रंजक गोष्टी, भरकटलेले मन जागेवर आणण्यासाठी अचानक केलेली उजळणी इत्यादी पद्धतीचा अवलंब केला आहे

इ-लनिंग म्हणजे रटाळपणे कंप्युटरचा वापर करुन काहीतरी डोक्यावर मारायचा प्रयत्न असणार ही प्रथम दर्शनी मनात येणाऱ्या विचाराला जाणीवपुर्वक फाटा दिला आहे आणि हाय डेफीनीशन animation, एकच थीम सुरवातीपासुन शेवटपणे राबवणाच्या अट्टाहास, मराठी आहे म्हणुन फक्त मराठीमध्येच सांगण्याचा आटोकाट प्रयत्न अशा प्रचलित प्रथा मोडुन काडुन विद्यार्थ्याचा मेंदु कसा काम करतो व कोणताही कंसेप्ट सोप्या मद्धतीने कसा समजावुन सांगता येइल याला पुरेपुर न्याय देण्याचा प्रयत्न केला आहे.

सी प्रोग्रॅमिंग लॅंग्वेज खर तर “प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजच्या शोधांची जननी” म्हणतात. डेनीस रीची या गणित व भौतीकशास्त्रा मध्ये द्विपधवीधर व्यक्तीने १९७२ मध्ये कंप्युटर मध्ये आवड असल्यामुळे AT & T Bell Labs मध्ये याची निर्मिती केली. आत्ता डॉट-नेट, जावा, ए.एस.पी,ओरॅकल, एस. क्यु. एल. मोबाइल applications, ERP असे ज्या वेळी शब्द कानावर पडतात त्यावेळी विद्यार्थी information technology च्या एक्सप्रेस वरुन भन्नाट वेगाने प्रवास करतो

पण खर तर या एक्सप्रेस वे च्या खाली अनेक वर्षापुर्वी पायवाट करण्याचे काम डेनीस ने करुन ठेवले व मित्रांनो आपण कीतीही मोठ्ठे झालो तरी पायवाटेवरुन केलेला प्रवासच रमणिय व लक्षात रहाणारा असतो

म्हणुनच डेनीस च्या या रमणीय सी लॅंग्वेजचा प्रवास आम्ही घडवुन आणणार आहोत आणि ही पायवाटच तुम्हाला कोणत्याही प्रकारच्या एक्सप्रेस वे वर प्रवास करायला शिकवेल

अनेक प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजीस या नंतर आल्या; काही वापरात राहील्या

काही डायनासोर प्रमाणे नामशेष झाल्या पण सी नुसती अनभिषक्त सम्राटच राहीली नाही तर १९७२ नंतर सर्व लॅंग्वेजीस वर सी चा प्रभाव दिसुन आला

लाखो – करोडॊ प्रोग्रॅमर्सची ही आवडती भाषा राहीली

सी चे सर्व चॅप्टर्स समाविष्ट करण्याव्यतिरीक्त विद्यार्थ्यांसाठी प्रश्नसंच, नोट्स, प्रोग्रॅम्स इत्यादी सर्व काही एकाच फ्रेमवर्क मध्ये कव्हर केले आहे.  

विद्यार्थ्यांना करीअर करण्यास अतिशय आवश्यक अशा या सी भाषेचे मराठीतुन इ-लर्निंग करण्याचा आमचा हा निव्वळ प्रेमापोटीचा प्रयत्न

विद्यार्थी त्याला भरभरुन प्रतिसाद देतील ही आम्हाला खात्री आहे

मनोगत पुर्ण होण्यापुर्वी एक दुख:द बातमी. हे फ्रेमवर्क डेव्हलप करत असतांनाच देवाने जगाला देणगी दिलेल्या या महान व्यक्तीचे आक्टोबर २०११ मध्ये दुख:द निधन झाले हा एक दैवदुर्विलास. आणि बघांना apple चा संस्थापक स्टिव्ह जॉब्स गेला त्याच आठवड्यात डेनीस सुद्धा काळाच्या पडद्याआड गेला. अखंड जगात जॉब्स च्या मृत्युची दखल घेतली गेली तर डेनीस गेला हे अनेक दिवसांनी माहीत झाले

Apple ची सुरवातीची ऑपरेटींग सिस्टिम नेक्सटेप खरं तर सी मधुन लिहीलेली पण….. असो…. नंतर नेट वर चर्चेच्या फैरी झाडल्या की “Without Dennis There would not have been jobs…!” हाच तर त्याचा ग्रेटनेस होता

डेनीस यांच्या जाण्याने प्रोग्रॅंमिग जगातील झालेली पोकळी भरुन निघणे अशक्य आहे असे जगातील ज्येष्ठ संगणक तज्ञांना असे वाटते. Hello World हा त्याचा प्रोग्रॅम जगातील सर्व सी च्या पुस्तकात पहील्या पानावर तुम्हाला आढळेल

आणि त्यातील अनेक जणांनी “Goodbye World” हा प्रोग्रँम लिहून श्रद्धांजली वाहीली…. या पेक्षा आणि काय हवे…?  आमच्या टिम तर्फे या महान व्यक्तीस श्रद्धांजली….

Access this framework with lot more stuff like C language MCQ, viva and interview preparation, Glossary, Solved Programs of C language etc. please register for Register / Login

cenglishcppengcmarathi

Leave a Reply