श्रद्धांजली DMR ला…!

Bye-Bye-Orkut-infographic

गेल्याच काही दिवसापुर्वी फेसबुक आणी व्हॉट्स-अप च्या वादळासमोर ऑकृट बंद पडली. काही महीन्यापुर्वी सॅमसंग आणी ऍपल समोरच्या वादळात ब्लॅकबेरी डळमळली. नोकीया सारखी जगप्रसिद्ध कंपनीवर तर सर्व मोबाइल कंपन्यांच्या ऍंण्ड्रॉइड ऑपरेटींग सिस्टीम समोर वाताहत होण्याची वेळ आली. या कंपन्यानी आस्तित्वासाठी काही कमी उपद्व्याप केले नव्हते. पण त्या नजरेआड गेल्याच.

2-23-11-Blog-Promotion-Checklist-Diagram-Image

यशस्वी होण्याकरीता तुम्हाला स्वत:चे मार्केटींग करायला लागते, चर्चेमध्ये रहायला लागते, नवीन नवीन काहीतरी द्यायला लागते, जगाबरोबर रहायला लागते, कस्टमरची नसं ओळखायला लागते इत्यादी इत्यादी अनेक मंत्र सध्या रुढ झाले आहेत. हे सर्व नसेल तर तुमचा प्रॉडक्ट अथवा इंन्व्हेंन्शन कितीही मोठे असले तरी अडगळीत पडून रहाणार अशीच काही दृढ मानसिकता झालेल्या या कार्पोरेट जगता मध्ये हे सर्व करून मोठेपणा मिळवलेल्या व हे काहीच न करता अजरामर झालेल्या व्यक्तीविषयी लिहीणार आहे.

Dennis_Ritchie_John_McCarthy_Steve_Jobs

२०११ चा आक्टोबर महीना तसा वादळी ठरला. ५ आक्टोबर ला स्टिव्ह जॉब्सचा मृत्यु… १० ते १२ आक्टोबरच्या आसपास डेनीस रिचीचा मृत्यु आणी २४ आक्टोबर ला जॉन मकॅर्थी चा मृत्यु…! मी जॉब्स बद्द्ल फार लिहिणार नाही पण इतर दोघांपैकी डेनीस बद्द्ल लिहायचे मनात आले. म्हणून हा लेख. आवडला तर शेअर जरूर करा. सोबत आम्ही वाहिलेली श्रद्धांजली आहेच व्हिडीओ च्या स्वरुपात तो सुद्धा पहा तुम्हाला वेळ असेल तर. शेवटी एक मिनिट शांत उभे राहूनच श्रद्धांजली वहायला हवी असा काही दंडक घालून दिलेला नाहियं…

तर… १२ आक्टोबर हि डेनीस रिची या संगणक शास्त्रज्ञाची पुण्यतिथी.

डेनिस चा जन्म न्युयॉर्कमध्ये ९ सप्टेबर १९४१ चा. त्याला तीन भावंड, दोन भाऊ आणी एक बहीण. डेनीस फिजीक्स व मॅथेमॅटीक्स मध्ये द्विपदविधर झाला ते सुद्धा हार्डवर्ड विद्यापीठातुन. पण दोन्ही विषया मध्ये फारशी गती नव्हती हे तो स्वत:च प्रांजळपणे कबूल करायचा.

शेवटी डेनीस १९६७ साली बेल लॅब्स मध्ये रुजू झाला त्यावेळी त्याच्या बरोबर केन सुद्धा होता. त्यापुर्वी डेनीसचे वडील बेल लॅब्स मध्येच काम करत होते. पण डेनीस वशिल्यावर वगैरे लागला नव्हता…!  पहील्याच वर्षी काम करत असतांना डॉक्टरेट मिळवण्याचा सुद्धा त्याने प्रयत्न केला. सध्या भारता मध्ये PHD मिळवणे खुप सोपे काम असले तरी Program Structure and Computational Complexity या विषयावर संशोधनात्मक प्रबंध सादर करून सुद्धा त्याला डॉक्टरेट मात्र मिळाली नाही.

त्या नंतर मात्र त्याने सहकाऱ्यांच्या बरोबर मुख्यत्वेकरून केन थॉंम्पंसनबरोबर काम करायला सुरवात केली. बेल लॅब्स मुख्यत्वे रिसर्च प्रोजेक्ट्स हातात घ्यायची व डेनीस व केन आला त्यावेळी MIT च्या सहकाऱ्यांच्या बरोबर Multics प्रोजेक्ट त्यानी घेतला होता. पण काही कारणास्तव बेल लॅब्स या संशोधनातुन बाहेर पडली व दुसरा प्रोजेक्ट ची शोधमोहीम सुरू केली. त्यावेळी त्यांना Digital Equipment Corporation साठी ऑपरेटींग सिस्टीम लिहीण्याचा प्रोजेक्ट मिळाला. त्यावेळी त्यांना लॅंग्वेजची जरूरी भासु लागली. मगं केन ने BCPL वर आधारीत B language लिहीली. डेनीस बाजूला असायचाच. B तयार झाली पण त्यामध्ये डेटा-टाइप, स्ट्रक्चर इत्यादी चा अभाव होता. डेनीस ने पुन्हा B वर काम करायला सुरवात केली आणी नवीन लॅंग्वेज लिहीली. ४ वर्षाच्या अथक परीश्रमानंतर C language ला जन्माला घातलं. (History of C)

111014015647-dennis-ritchie-ken-thompson-bell-labs-story-top

याच C चा वापर करून दोघा महाशयांनी मग १९७३ मध्ये UNIX operating system लिहीली व या ऑपरेटींग सिस्टीम ने आजतागायत स्वत:चे स्थान अढळ राखले आहे. मगं गुगल असो वा Apple असो या सर्वाना सर्व काही उद्योग करण्यासाठी UNIX वर अवलंबुन रहावे लागते.

कंप्युटर प्रोग्रॅमिंग शिकणाऱ्या, शिकलेल्या, अथवा सॉफ्टवेअर मध्ये काम करणाऱ्या जगामधील कोणत्याही व्यक्तीला डेनीस हे नाव माहीत असतेच. ते माहीत नसलेच तरी C नावाची programming language तो किंवा ती एकतर शिकलेली असते किंवा आहे हे माहीत असते. याच programming language चा तो जनक अशी त्यांची ओळख. जगभर तंत्रज्ञाना मध्ये इतकी उलथा-पालथ गेल्या २० वर्षापासून होत असतांना सुद्धा व अनेक कंप्युटर प्रोग्रॅमिंग लॅंग्वेजीस येउन गेल्या असतांना सुद्धा C language मात्र १९७१ पासून अनभिषक्त सम्राज्ञी प्रमाणे राहीली.

नोकीयाची सिंबीयन ऑपरेटींग सिस्टीम असो वा ऍंन्ड्रॉइड ऑपरेटींग सिस्टीम असो त्यांना C language ची मदत घ्यावीच लागते हेच तीच्या सौंदर्याचे व ताकदीचे खरे रहस्य. अर्थात तीच्या वर टिका करणाऱ्यांची संख्या कमी नाही. पण टिका करतांना सुद्धा या सर्व टिकाकारांच्या आत C language बद्दल एक आसक्ती असतेच व हे सुद्धा ते मान्य करतात.

एन्ट्री लेव्हल प्रोग्रॅमर…ज्युनिअर डेव्हलपर…सिनीअर डेव्हलपर…टिम लिडर…त्या नंतर प्रोजेक्ट लिडर… मग मॅनेजर… त्या नंतर प्रोजेक्ट मॅनेजर… मग सिस्टीम ऍनेलिस्ट… मग अनेक काही तत्सम पोस्ट… व या एकाच कंपनीत मिळाल्या आहेत अशा किती व्यक्ती तुमच्या आजूबाजूला आहेत ते सांगाल…? बरं काही जणांची नावे सांगाल सुद्धा पण असेल, तर ती व्यक्ती तुम्हाला एखाद्या मोठया कंपनीची मालक वगैरे नक्कीच झालेली आढळेल. राजकारण असो वा व्यवसाय, करीअर  साठी कित्येक जण आज या कंपनीत तर उद्या दुसऱ्या कंपनीत पॅकेज साठी उड्या मारतांना आपण पहातो. व त्याचे ते समर्थन सुद्धा करतात. बरं हे पॅकेजची व्हॅल्यु कधी न संपणारी. त्यामुळे घालमेल, स्पर्धा, वेग, कुरघोडी या सर्व बाबी हि या प्रगतीची दुसरी बाजू. आजुबाजूला पसलेल्या या महाकाय विश्वामध्ये आपण प्रगती, यश याच मोजपट्टीने मोजतो. मग या पुढे आपल्या समोर नावे येतात ती इन्फोसीस, विप्रो… त्याहीपुढे जाउन मग स्टिव्ह जॉब्स, शेवटी बिल गेट्स… आपली बुद्धी तेथे संपते…

डेनीस खरं तर या सर्वांच्या पलीकडे पोहोचला होता ते फक्त C language मुळे नाही तर त्याच्या स्वभावगुणांमुळे. कुणाच्या अध्यात-मध्यात नसणारी व आपण बरे व आपले काम बरे अशा प्रकारची काही माणसे आपण आपल्या आजूबाजूला बघतो. डेनीस त्याच पैकी एक. एखाद्या कामा बद्दल व एखाद्या कंपनी बद्दल कोणत्या पातळची निष्ठा बाळगता येउ शकते हा परीपाठ डेनीस ने देउन ठेवला आहे.

 

20111105_OBP001

आत्ता तुम्ही अनेक गॅजेट्स वापरत असाल. त्या मध्ये टॅब असेल, स्मार्ट-फोन असेल किंवा ATM असेल. शेवटी सगळ्यांना ऑपरेटींग सिस्टीम वरच काम करायला लागत. आणी हि ऑपरेटींग सिस्टीम कशी काम करेल हे ठरवण्याच काम २ महाभागांनी मागील शतकात करून ठेवलय. त्यापैकी एक म्हणजे डेनीस व दुसरा जॉन मकॅर्थी. गंम्मत म्हणजे हे दोघही मॅथेमॅटीक्स पदवीधर होते. दोघसुद्धा कंप्युटर क्षेत्रामध्ये आले त्यावेळी दोघांच एकच वेड होत ते म्हणजे त्यांना संगणकाशी बोलायची इच्छा होती. १९५८ साली जॉन ने LiSP ला जन्माला घातलं आणी पुढ्च्या दशकात डेनीसन C ला. Lisp हि लॅंग्वेंज सुद्धा एकमेव high level language आहे जी अजुन सुद्धा वापरली जाते. विषेश म्हणजे हे दोघ महाभाग एकाच वर्षी एकाच महीन्यात काळाच्या पडद्याआड गेले. एक सत्तरराव्यावर्षी व दुसरा ८३ व्या वर्षी हा दैवदुर्विलास.

कोट्यावधी डॉलर्सची उलाढाल त्याच्या आजुबाजूला दररोज होत असतांना डेनीस मात्र प्रत्येक दिवशी मुंबईचा चाकरमानी जसा असतो त्याप्रमाणे न्युजर्सीच्या मरे हिल्स मधील AT&T Bell मध्ये काम करण्यासाठी ऑफीस मध्ये जाउन बसायचा. व तेथुनच निवृत्त झाला. आयुष्यभर C language च्या संदर्भात काम करीत राहीला. म्हणूनच कि काय त्याला सॉफ्टवेअर इंजीनीअर असे न ओळखता कंप्युटर सायंटीस्ट असे ओळखले जाते.

सध्या विद्यार्थ्यांना मुख्यत्वे भारतामधील तरुण पिढीला अनेक लॅंग्वेजीस शिकायच्या असतात. यादी न संपणारी असते. शिवाय नवीन-नवीन सर्टीफीकेशन्स मिळवून सुद्धा जगाच्या मागे पडू कि काय अशी भिती दिवस-रात्र सतावत असते. त्यामुळे कायम ऑनलाइन राहणे, बायोडेटा अपडेट करणे, नेहमी असलेल्या नोकरीपेक्षा चांगल्या नोकरीच्या शोधात रहाणे, हे काम दिवसरात्र मनात चालू असते. मुखत्व्ये अशा पिढीला डेनीस कडुन शिकण्यासारखे खुप काही आहे.

Left to right Kenneth L. Thompson, Dennis M. Ritchie

हल्ली सॉफ्टवेअर कंपनीमध्ये काम करणारे व श्रेय घेणारे वेगवेगळे असतात हि ओरड कायम मी माझ्या विद्यार्थ्यांकडून ऐकते. हा अवलिया इतका नम्र होता की C language चे श्रेय त्याच्या सहकऱ्यांनी व जगाने त्याला देउन सुद्धा त्याच्या brief bio-data मध्ये मात्र C language चा खरा मानकरी B language डॆव्हलप करणाऱ्या  केन थॉंम्पसन ला दिले आहे. इतकेच नाही तर यांची दोस्ती इतकी घट्ट होती कि त्यांना दिली गेलेली सर्व Awards सुद्धा विभागुन देण्याशिवाय पर्याय उपलब्ध नव्हता. फक्त नजरच टाकांना त्याना मिळालेल्या Awards वर

 • ACM Programming Systems and Language Papers Award (1975)
 • ACM A.M. Turing Award (1983)
 • ACM Software System Award (1983)
 • IEEE Emmanuel R. Piore Award (1983)
 • Ritchie was elected to the National Academy of Engineering (1988)
 • IEEE Richard W. Hamming Medal (1990)
 • IEEE Computer Pioneer Award (1994)
 • Computer History Museum Fellow Award (1997)
 • National Medal of Technology from President Bill Clinton (1998)
 • ACM SIGOPS Hall of Fame Award (2005)
 • Japan Prize for Information and Communications (2011)

C च वैशिष्ठे अनेक सांगता येतील पण सर्वात महत्वाच म्हणजे C च्या पुर्वी व नंतर आलेल्या लॅंग्वेज मध्ये लिहीलेला कोड हा मशीन डिपेंडंट असायचा. हि मक्तेदारी डेनीसने मोडीत काढली. व हेच या लॅंग्वेजचे यश झाले.

नंतर C++ आली. बियान स्ट्राउस्ट्रुपवर C language चा प्रभाव होताच. शिवाय ती सुद्धा AT&T Bell च्या प्रयोगशाळेत मध्येच तयार झालेली. नंतर Microsoft ने आस्तितवात रहाण्यासाठी C# काढली, Apple ने Objective C काढली तर सन मायक्रोसिस्टीम ने Java काढली पण या सगळ्या लॅंग्वेजची पाळेमुळे C लॅंग्वेजमध्येच होती व आहेत.

cool-innovator-marketer-difference1

Apple चा संस्थापक ५ आक्टोबर २०११ साली गेला. जगभर त्याची चर्चा झाली. C चा इन्व्हेंटर १२ आक्टोबर २०११ साली गेला. ते जगाला नाही पण त्यांच्या परीवाराला सुद्धा कळाल नाही. जॉब्सच्या Apple ची ऑपरेटींग सिस्टीम Unix based आहे व ती C मध्येच लिहीलेली…. हेच सुद्धा डेनीसच अजुन एक यश

डेनीस चे इतर उद्योग…!

गंम्मत म्हणजे डेनीसने सुद्धा तुमच्या-आमच्या प्रमाणे इतर उद्योग सुद्धा केले होते. कॉलेजमध्ये असतांना त्याने  वरकमाईसाठी प्रोफ़ेशनल ट्रक ड्रायव्हर म्हणून काम केले होते. काही काळ त्याने स्टुडीओमध्ये रेकॉर्डींग इंजीनिअर म्हणुन सुद्धा काम केले शिवाय एका म्युझिक गृपचा तो सदस्य सुद्धा होता. हे सगळे कमीच झाले असल्यासारखे म्हणून कि काय त्याने एक स्थानिक निवडणूक लढवुन हरण्याचा प्रताप सुद्धा केला!

आहेच ती तशी लॅंग्वेज व ती डेव्हलप करणारा अवलिया…

Dennis MacAlistair Ritchie हे त्याचे पुर्ण नाव. म्हणुन त्याचे सहकारी त्याला  DMR अशी हाक मारत असतं. म्हणूनच या पोस्टचे नाव DMR ठेवले.

OLYMPUS DIGITAL CAMERA

 

 

 

 

 

 

 

 

Rest in Peace, Dennis

 

Leave a Reply