Boilerplate Code

 

3-idiots-20h

हे पोस्टर मी का टाकले आहे सुरवातीला, ते पोस्ट वाचून झाल्या नंतर कळेल…

भारतीय लेखकांनी programming वर लिहीलेल्या पुस्तकामध्ये हा शब्द फार क्वचित सापडतो पण अनेक फॉरेन ऑथर्सच्या पुस्तका मध्ये किंवा संशोधनपर लेखामध्ये तुम्हाला हा शब्द आढळेल.

dont_repeat_yourself

  1. तुम्ही कॉलेज मध्ये असतांना C under Windows म्हणजेच Win32 programming शिकला असाल तर WinMain मध्ये एक ठराविक कोड तुम्ही सर्व प्रोग्रॅम्स मध्ये copy-paste केला असल्याच आठवत असेल.
  2. C++ कॉलेजमध्ये शिकतांना व नक्की काय करायचे आहे ते न समजता सुद्धा class definition लिहून getdata() आणी putdata() सारखी member functions लिहीली असतील. हि सुद्धा अनेक प्रोग्रॅम मध्ये तुम्ही ठरावीक पद्धतीने थोडेफार बदल करून लिहीला असल्याचे आठवत असेल कदाचित.
  3. HTML वापरून जर तुम्ही कधी वेबसाइट तयार केली असेल तर त्यातील बराचसा code हा एक सारखाच पाहील्यासारखे वाटले असेल.
  4. सध्या तुम्ही जावा/सी/सी++ चे IDE वापरत असाल तर class/file inclusion इत्यादी कोड तुम्हाला तयार करून मिळतो.

boilerplate1

वर दिलेले सर्व प्रकार हे थोड्याफार प्रमाणात Boiler Plate code मध्ये मोडतात…!

प्रोग्रॅमरना कोड लिहीतांना काही ठरावीक कोड पुन्हा पुन्हा लिहीवा लागतो. कॉपी-पेस्ट करून अथवा काहीवेळा थोडाफार बदल करून हाच कोड लिहीण्याच्या प्रकाराला म्हणजेच त्या कोडला Boiler Plate code असे म्हणतात. इंग्रजी ही जगातील सर्वात जास्त प्रवाही व म्हणूनच समृद्ध भाषा आहे हे अनेक शब्द पाहीले की पटते. Boiler Plate Code हा सुद्धा इंग्रजी भाषेचे सौंदर्य अशाच प्रकारे दाखवणारा…

 

 

rails_code

variables declaration, data validation साठी लागणारा टिपीकल कोड, heap वरून मेमरी मिळाली की नाही हे चेक करण्यासाठी डॆटा-स्ट्रक्चर मधील प्रोग्रॅम मध्ये अनेक फंक्शन्स मध्ये लिहावा लागणारा कोड हे सर्व याच Boiler Plate Code मध्ये तुम्ही समजू शकता…!

boilerplate

हा शब्द मात्र प्रिंटींग इंडस्ट्रीमधून import केला यात मात्र थोडेफार मतभेद आहेत. बॉइलर तयार करण्यासाठी स्टीलची प्लेट वापरली जाते. पण अशाच प्रकारची प्लेट न्युजपेपर इंडस्ट्री मध्ये १८ व्या शतकाच्या शेवटी व १९ व्या शतकाच्या सुरवातीला printing करण्यासाठीई वापरली जायची. एकाच प्रकारच्या जाहीराती अथवा टेक्स्ट मॅटर अखंड देशातील सर्व newspaper मध्ये छापायच्या असतील तर बॉइलीग lead हे प्लेटवर ओतुन साचे करण्यात येत असतं व या प्लेट सर्व ठिकाणी प्रिंटींग करण्यासाठी न्युजपेपर कंपनीला पाठवत असतं.

असाच काही तरी repetition of code चा प्रकार प्रोग्रॅमिंग मध्ये आढळल्यानंतर boiler plate code हि संज्ञा रुढ झाली.

मात्र एक महत्वाचे लक्षात ठेवा. Boiler Plate code हि Good Programming Practice समजली जात नाही….!

इंजीनीअरींग आणी डिप्लोमाचे काही विद्यार्थी (यातील अनेक Three Idiots मधील अमीर खान असतात…!) 40 मार्क मिळून पेपर सोडवण्यासाठी मोठ्या उत्तरामध्ये काही भाग पुन्हा-पुन्हा लिहून उत्तर मोठे करून लिहीतात. प्रसंगी पुरवण्या (Suppliment) जोडतात पण पेपर भरतात. जेणेकरून ४० मार्क तरी पडावेत म्हणून…!

हा प्रकार तर real life  मधील बॉइलर प्लेट कोड नसेल ना…?

 

One thought on “Boilerplate Code

Leave a Reply