About C Marathi™

आमच्याविषयी थोडेसे:

“e in the e-learning should be  interpreted as exciting (चित्तवेधक), energetic (उत्साहपूर्ण), enthusiastic (उल्हासदायी), emotional (भावनीक), extended (विस्तारक), excellent (उत्कृष्ठ), effective (परीणामकारक) and education (शिक्षण) besides electronic (संगणकीय)”….बर्नार्ड लस्कीन

Change is Constant असं पूर्वी कधीच जाणवलं नव्हतं, ते गेल्या काही वर्षात प्रकर्षानं जाणवत आहे. थक्क करणारी प्रगती, तंत्रज्ञानाचा वेग आणि माहितीचा विस्फोट. Facebook, Twitter सारख्या “Social Networking” च्या क्षणाक्षणाला विस्तारत जाणाऱ्या “College” मध्ये प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्याला आम्हाला Programming शिकवायचंय…अभ्यासाचं Tension न देता…शिक्षण कंटाळवाणं न करता…व ते सुद्धा सहजसोप्या अशा मायबोलीत. विषय मराठीतून समजला तर इंग्रजीमधून उत्तरे द्यायला काय अवघड आहे हे माझ्याच विद्यार्थ्यांच्याकडून मला मिळालेल्या प्रतिक्रियेवर… गेली १३ वर्षे,  ३००० हून जास्त विद्यार्थ्यांना प्रोग्रॅमिंग शिकवताना मलाच मिळालेल्या ज्ञानाच्या शिदोरीवर हे अभिनव प्रकारचे framework तयार केलंय. फक्त जे काही करायचं होतं व या पुढे करायचं आहे…ते असली हिऱ्याप्रमाणेच… कारण विद्यार्थ्याच्या व्यक्तीमत्वाला पैलू पाडायचं आमचं स्वप्न आहे..अर्थात या कारखान्यातील सर्व कारागीर अस्सल हिरे…कोळशाच्या खाणीतून आणलेले…म्हणूनच हा प्रकल्प पुर्ण झाला..   

Logo

वेगळ्या पद्धतीनं शिकवायच म्हणजे कसं? आणी त्याचा Logo कसा हवा? या कामी आमच्याच एका सहकाऱ्याने आमच्या कंपनीच्या नावाच्या सार्धम्याशी एक Logo तयार केला. Theme होती “प्रयत्न चौकटीतून बाहेर पडायचा…(Out of Box Thinking)” आणी एक छान लोगोची निर्मीती सुद्धा झाली. 

खरं तर e-learning म्हणजे Electronic Learning अशी एक संकुचीत व्याख्या आहे. त्याला CBT (Computer Based Training), IBT (Internet Based Training), VLE (Virtual Learning Environment), online education अशी अनेक नाव आहेत. पण आम्हाला या पेक्षासुद्धा काहीतरी वेगळ द्यायच होत.

e-learning चा pioneer समजला जाणाऱ्या बर्नार्ड लस्कीन ने केलेली वरील व्याख्या आम्हाला वाचनात आली आणी आमच फ्रेमवर्क त्या प्रकारचं करण्यात आम्ही यशस्वी झालो. पण त्यासाठी प्रचलीत पद्धती मोडून काढण्याची जरूरी होती. आणी त्यानंतरच हा 9e चा concept वापरून आम्ही C Marathi चा project तयार केला    

Access this framework with lot more stuff like C language MCQ, viva and interview preparation, Glossary, Solved Programs of C language etc. Register here for Discount Coupon

Leave a Reply